Next Generation Network (NGN) वेब पोर्टलचे भव्य शुभारंभ

Next Generation Network (NGN) वेब पोर्टलचे भव्य शुभारंभ

पोलीस फ्लॅश न्यूजचे संपादक प्रकाश इगवे व डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष गणेश हुंबे यांच्या हस्ते उद्घाटन

थेरगाव, 18 डिसेंबर : डिजिटल युगाच्या बदलत्या गरजा ओळखून मीडिया आणि कम्युनिकेशन क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत Next Generation Network (NGN) या नव्या वेब पोर्टलचा भव्य शुभारंभ करण्यात आला. “nextgenerationnetwork.in” या नावाने सुरू झालेल्या या वेब पोर्टलचे उद्घाटन पोलीस फ्लॅश न्यूजचे संपादक प्रकाश इगवे आणि डिजिटल मीडिया संघचे अध्यक्ष गणेश हुंबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

NGN या वेब पोर्टलची संकल्पना व स्थापना CEO निशा इगवे यांनी केली असून, हे पोर्टल केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता News, Event Management, Public Relations (PR) आणि Digital Media Services या बहुआयामी सेवांवर भर देणार आहे. समाजापर्यंत जलद, विश्वासार्ह आणि दर्जेदार माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने NGN ची निर्मिती करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना निशा इगवे म्हणाल्या,आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून समाजोपयोगी, वस्तुनिष्ठ आणि तत्काळ माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेच NGN चे मुख्य ध्येय आहे.”

तसेच आगामी काळात युवक, उद्योजक, सामाजिक संस्था आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटनप्रसंगी प्रकाश इगवे यांनी NGN च्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की,“नव्या पिढीच्या विचारांशी सुसंगत, दर्जेदार आणि बहुआयामी सेवा देणारे हे पोर्टल डिजिटल मीडियात निश्चितच वेगळा ठसा उमटवेल.”

तर गणेश हुंबे यांनी NGN ला शुभेच्छा देताना डिजिटल मीडियामध्ये विश्वासार्हता, पारदर्शकता आणि दर्जा जपणे ही मोठी जबाबदारी असल्याचे नमूद केले.

या शुभारंभ सोहळ्याला पत्रकार अस्मिता हिरवे, Admin स्नेहा इगवे, स्थानिक नागरिक तसेच डिजिटल मीडिया संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NGN वेब पोर्टलमुळे बातम्या, कार्यक्रम व्यवस्थापन आणि पीआर सेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये नव्या शक्यता निर्माण होतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *